मंगळवार, १५ जून, २०२१

न्युझिलंड - इंग्लंड कसोटी मालिका


न्युझिलंडचा  इंग्लंड विरुद्ध  ऎतिहासिक विजय 

   वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी खेळण्यात आलेल्या  यांच्यामधील 2 कसोटी सामन्यांच्या  मालिकेमध्ये  न्युझिलंड ने 1-0  असा विजय मिळवून इतिहास रचला आहे. 

    1999 नंतर  इंग्लंडमध्ये मालिकेतील पहिला विजय नोंदवून न्युझिलंडने हा  इतिहास रचला आहे.  म्हणजे तब्बल 22 वर्षांनी मालिका जिंकण्याचा विक्रम त्यांनी  केला आहे. आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा फायनलसाठी ही कामगिरी  संपूर्ण संघाला आत्मविश्र्वास देणारी आहे .

    मागील काळातील आकडेवारी आपल्या विरोधात असून देखील ,यासारखी  कामगिरी करून स्वत:चा इतिहास पुन्हा लिहा. हेच न्युझिलंडने सांगितले.

     ब्रॉड-अँडरसनच्या दिग्गज गोलंदाजीची  जोडी असतांना देखील  न्युझिलंडचा फलंदाजानी चांगली खेळी केली. केन विल्यम्सन दुखापतग्रस्त असल्यामुळे टॉम लाथम ला न्युझिलंडचे कर्णधारपद देण्यात आले . 'कर्णधार म्हणून शिकणे हा एक मोठा सन्मान आणि छान गोष्ट आहे. एका आठवड्याच्या कालावधीत मोठे आव्हान येत आहे ' असे टॉम लाथम म्हणाला.

इंग्लंड  -303/10   (पहिला डाव )

न्युझिलंड - 388/10 (पहिला डाव )

इंग्लंड   - 122/10  ( दुसरा डाव )

न्युझिलंड - 41/2 (दुसरा डाव)

'न्यूझीलंडने आम्हाला पछाडले आहे हीच  बाब खरी आहे. त्यांनी खरोखर चांगले क्रिकेट खेळले आहे. आणि आम्हाला माहित आहे की आम्ही यापेक्षा एक चांगली बाजू आहोत.संपूर्ण गेममध्ये न्यूझीलंडने निश्चितच आम्हाला मागे टाकले ' असे जो रूट ( इंग्लंडचा कर्णधार )म्हणाला.

सामनावीर  - मॅट हेन्री 

मालिकावीर - डेव्हन कॉनवे (न्यूझीलंड) आणि रोरी बर्न्स( इंग्लंड )

डब्ल्यूटीसी  ( World test championship ) चा अंतिम सामना 18 जूनपासून साऊथॅम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जाईल . भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना होणार आहे.

World Test Championship फायनल जिंकणाऱ्या संघाला  1.6 मिलियन अमेरिकन डॉलर (11 कोटी 71 लाख रुपये अंदाजे)  रक्कम बक्षिस म्हणून मिळणार असल्याचे ICC ने जाहीर केले आहे. तर उपविजेत्या संघाला 8 लाख मिलियन अमेरिकन डॉलर (5 कोटी 85 लाख रुपये अंदाजे) रक्कम मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा