शुक्रवार, ४ जून, २०२१

World Test Championship

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021


मिशन: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप :
 भारत- न्युझिलंड यांच्या मधील आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप च्या फायनलला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत .18 जून पासून खेळण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर बलाढ्य न्युझिलंडचे आवाहन असणार आहे. हा सामना साऊथ हॅम्पटन चा मैदानावर खेळाला जाणार आहे. 'भारतीय संघावर फायनलचा कोणता ही दबाव नाही ' असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. इंग्लंड चे वातावरण वेगळे असल्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेत फायनल चे आवाहन पेलावे लागणार असल्याचे त्याने सांगितले. भारतीय संघाचा विचार करता , रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांचा वर सलामी ची भिस्त अवलंबून आहे

तर मधल्या फळीत, विराट कोहली ,चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा वर फलंदाजी ची जबाबदारी असणार आहे. गेल्या काही काळात भारतीय गोलंदाजी अतिशय चांगली राहिल्यामुळे फायनल मधे देखील इशांत शर्मा ,  मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह आपली कामगिरी चोखपणे पार  पाडतील  अशी सर्व भारतीयांना अपेक्षा आहे.तर फिरकी गोलंदाज अश्विन आणि रविंद्र जडेजा  संघाला टेस्ट चॅंपियन्स  चषक जिंकून देतील अशी अपेक्षा आहे.


https://unsplash.com/photos/iDTDvSDEVjw
Photo- chirayu Trivedi from unsplash 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांच्या भूमीत जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवून भारतीय संघाने आपली ताकद क्रिकेट जगताला आधीच दाखवली आहे. त्या दौऱ्यात  चेतेश्वर पुजारा ने दाखवलेला संयम आणि रिषभ पंत ने दाखवलेला आक्रमकपणा यामुळे भारतीय संघ मजबूत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे 
परंतु ,न्युझिलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा संघात देखील रॉ स टेलर , ट्रेंट बोल्ट , टिम साउदी , नील वॅगनर सारखे दिग्गज खेळाडू असल्यामुळे  या संघास कमी लेखून भारतास परवडणारे नाही. त्या मुळे फायनलची  मॅच अटीतटीचा  होण्याची शक्यता आहे.

टेस्ट चॅम्पियनशिप चषक विषयी...

सहभागी संघ - 9
 स्पर्धेची सुरवात - 1 ऑगस्ट 2019
अंतिम सामना  - 18 जून 2021
अंतिम सामन्याचे ठिकाण - साऊथ हॅम्पटन , इंग्लंड.

संघ (यातून निवडला जाईल ):
  रोहित शर्मा, मयांक अग्रवाल,  चेतेश्वर पुजारा, विराट कोहली ( कर्णधार) ,अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार) , के एल् राहुल, वृद्धीमान साहा , हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल,  वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा , जसप्रीत बुमराह,  मोहम्मद शमी , उमेश यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा