गुरुवार, १७ जून, २०२१

जागतिक कसोटी अजिंक्यपद


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021

सध्याच्या 4 जी /5 जी जगात सर्व गोष्टी वेगवान होत आहेत. क्रिकेट ही त्याला अपवाद राहिलेले नाही.  कसोटी क्रिकेट पासून रसिक वनडे  कडे वळू लागले.आता मात्र वनडे पासून 20-20 ओवर चा क्रिकेट कडे लोक आकर्षित झाले.  

 त्यामुळे कसोटी सामन्यांना लोक पाठ फिरवू लागले. अशावेळी आय सी सी  ( ICC ) ने घेतलेला एक निर्णय कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी देणारा ठरत आहे. तो निर्णय म्हणजे जागतिक कसोटी अजिंक्यपद  ( World Test championship ).

सुरवातीच्या काळी कसोटी सामना म्हणजे  निर्धाव षटके , चौकार - षटकारांचा दुष्काळ असे चित्र होते. आता मात्र खेळाडू अधिक आक्रमक खेळताना दिसत आहेत.

या स्पर्धेमध्ये  प्रत्येक कसोटी सामान्यांना पॉईंटस (गुण) देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघ सामना अनिर्णित ठेवण्यापेक्षा जिंकन्यासाठी प्रयत्न करु लागला.खेळाचे  डावपेच देखिल बदलले . त्यामु़ळे कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक झाले आहे.

या कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी ठरलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा  अंतिम सामना 18 जून पासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टनच्या रोझ बाऊल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्युझिलंड यांच्यात हा सामना होणार आहे. 

आणि जगाला पहिला ' कसोटी क्रिकेटचा चॅम्पियन ' मिळणार आहे.  चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या संघाला मिळणारी बक्षिसांची रक्कम ICC ने जाहीर केली आहे. 


https://unsplash.com/photos/iDTDvSDEVjw

Photo by Chirayu Trivedi  


 विजयी संघ - 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर ( 11 कोटी 71 लाख रुपये अंदाजे)

उपविजेता संघ  - 8 लाख मिलियन अमेरिकन डॉलर ( 5 कोटी 85 लाख रुपये अंदाजे)

तिसरे स्थान ( ऑस्ट्रेलिया ) - 4.5 लाख डॉलर ( सुमारे 3 कोटी 30 लाख रुपये )

चौथे स्थान ( इंग्लंड)  - 3.5 लाख डॉलर ( सुमारे अडीच कोटी रुपये )

वेस्ट इंडीस ,  दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांग्लादेश या संघांना  प्रत्येकी 1 लाख डॉलर ( सुमारे 73 लाख रुपये)  मिळतील .

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल चा सामना 18 ते 22 जून  या कालावधीत खेळला जाणार आहे. जर सामन्यात पावसाचा व्यत्यत आला तर 23 जून हा एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

 जर अंतिम सामना अनिर्णित राहिला तर  दोन्ही संघांना 'संयुक्त विजेतेपद ' दिले जाणार आहे. आणि बक्षिसांच्या रक्कमची समान विभागणी होणार आहे. असे आयसीसीने जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 सध्याच्या 4 जी /5 जी जगात सर्व गोष्टी वेगवान होत आहेत. क्रिकेट ही त्याला अपवाद राहिलेले नाही.  कसोटी क्रिकेट प...